adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बचत गट: महिला सक्षमीकरण आणि रोजगाराचे माध्यम - आमदार अमोल पाटील

 बचत गट: महिला सक्षमीकरण आणि रोजगाराचे माध्यम - आमदार अमोल पाटील प्रा. सुधीर महाले एरंडोल, प्रतिनिधी:  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महिलांना...

 बचत गट: महिला सक्षमीकरण आणि रोजगाराचे माध्यम - आमदार अमोल पाटील



प्रा. सुधीर महाले एरंडोल, प्रतिनिधी: 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात बचतगटांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल पाटील यांनी केले. एरंडोल तालुक्यातील विखरण येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व पंचायत समितीच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या विखरण-रिंगणगाव गटातील प्रांजल महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळाव्यात ते बोलत होते.

आमदार अमोल पाटील आणि मृणाल पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार अमोल पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात उमेद अभियानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले. बचतगटांमुळे महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असून, उमेद अभियान हे लाखो महिलांचे हक्काचे व्यासपीठ बनले असून, यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढून त्या स्वावलंबी बनल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बचत गट हे महिलांच्या सबलीकरण आणि सशक्तीकरणाची एक चळवळ बनल्याचेही ते म्हणाले.

श्रीमती मृणाल पाटील यांनी महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. बचतगटांमुळे गावातच व्यवसाय सुरू करता येत असल्याने महिलांना स्थानिक स्तरावरच रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी प्रांजळ महिला प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल पाटील, श्रीमती मृणाल पाटील तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुका संघटक संभाजी देसले, युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील, माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, देविदास चौधरी यांच्यासह प्रभाग संघाचे, बचतगटांचे पदाधिकारी, तालुका अभियान कक्षाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मेळाव्यात उपस्थित महिलांनी आमदार अमोल पाटील आणि श्रीमती मृणाल पाटील यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला आणि बचत गटांमार्फत सुरू असलेल्या विविध व्यवसायांची माहिती जाणून घेतली. यावेळी बचत गटांना कर्जाच्या धनादेशांचे वाटपही करण्यात आले.

No comments