फैजपूरला वादग्रस्त चित्रपट उदयपूर फाईल्स चे प्रदर्शन थांबवा; उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर कौमी एकता फाउंडेशनची मागणी इदू पिंजारी फै...
फैजपूरला वादग्रस्त चित्रपट उदयपूर फाईल्स चे प्रदर्शन थांबवा; उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर
कौमी एकता फाउंडेशनची मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जगातील शांतीचा मार्ग दाखविणारे व इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या बद्दल फिल्म दिग्दर्शक अमित जानी यांनी त्यांनी, "उदयपूर फाईल्स" या नावाची फिल्म बनवून सर्व जगातील मुस्लीमांची धार्मिक भावना दुखवल्याने सदरची फिल्म दि. ११ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे ती करु नये व अमित जानी व इतर सर्वांविरुध्द धार्मिक भावना दुखविल्याने गुन्हा दाखल करा अशी मागणी कौमी एकता फाउंडेशन च्या वतीने करण्यात आली आहे. फिल्म दिग्दर्शक अमित जानी यांनी त्यांच्या जानी फायरफौक्स फिल्म कंपनी या मार्फत "उदयपूर फाईल्स" या नावाची फिल्म बनवून त्यामध्ये इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्या बद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण व संवाद दाखविल्याने सर्व जगातील मुस्लीमांची धार्मिक भावना दुखवलेली आहे. व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.सदरचा चित्रपट दि. ११ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून ती करु नये व अमित जानी न व इतर सर्वाविरुध्द धार्मिक भावना दुखविल्याने भा. द. वि. कलम २९५-ए, २९८, १५३-ए व ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावे. सध्या इस्लाम धर्माच्या विषयी तसेच मुस्लिमान बदनाम करण्याचा देशातील धर्मांधांमध्ये ट्रेंड सुरू असून हे कदापि खपाऊन घेतले जनार नसून या विषयी कायदेशीर लढू अशी ही भावना या ठिकाणी व्यक्त केले आहे.या विषयी फैजपूर प्रांताधिकारी यांच्या मार्फत म.राज्यपाल,मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कडे निवेदन सादर केले आहे.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शेख कुर्बान उपाध्यक्ष शेख इरफान, सैय्यद असगर,सचिव सय्यद जावेद,कलीम खा,शेख हमीद,शेख अख्तर,शेख निसार,शेख कलीम, फिरोज खान,शेख साबीर,शेख रियाज आदी सह उपस्थित होते.
No comments