Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाविकांचे सुविधा साठी निधी कमी पडू देणार नाही -:- ना.गिरीश महाजन डिंगम्बर महाराज मठाचे वारकरी सभामंडपा चे झाले लोकार्पण

  भाविकांचे सुविधा साठी निधी कमी पडू देणार नाही -:- ना.गिरीश महाजन डिगंबर महाराज मठाचे वारकरी सभामंडपा चे झाले लोकार्पण  इदू पिंजारी फैजपूर ...

 भाविकांचे सुविधा साठी निधी कमी पडू देणार नाही -:- ना.गिरीश महाजन

डिगंबर महाराज मठाचे वारकरी सभामंडपा चे झाले लोकार्पण 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पंढरपूर क्षेत्रात येणाऱ्या वारकरी भाविक  भक्तांचे सुविधा करणे साठी शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही  ना. गिरीश महाजन यांनी दिली. आज पंढरपूर येथील डिगंबर महाराज चिनावलकर मठाचे वारकरी सभामंडपाचे  लोकार्पण ना. गिरीश महाजन यांचे हस्ते करण्यात आले  कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज होते आषाढी यात्रेनिमीत्त डिगंबर महाराज मठात हजारो वारकऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी प्रास्ताविक  करून संस्थेचा ३५ वर्षांचा कामकाजाचा आढावा सादर केला  जनार्दन हरिजी महाराज यांनी सांगितले की संतांचे भूमिके मुळे भाविकांना आस्था प्राप्त होते तर राजकारणी नेत्यांची भूमिकेने समाजात सुव्यवस्था निर्माण होते 

सदरचे काम ना. गिरीश भाऊ व मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे  व सहकाऱ्यांनी केले आहे याबाबत त्यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले  या वारकरी सभामंडपाकरीता मागील आषाढी वारीत ना. गिरीश महाजन यांनी सुमारे एक कोटी रुपये मंजूर केले होते हे काम जलदगतीने करण्यासाठी मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे,  निलेश राणे,  हिरालाल चौधरी, शरद महाजन, सचिव विठ्ठल भंगाळे सर्व विश्वस्त मंडळ यांनी पाठपुराव्याने हे काम जलदगतीने पूर्ण झाले असे उदगार काढून नरेंद्र नारखेडे यांचे कार्य कुशलतेचा ना. महाजन यांनी गौरव केला  यापुढच्या उर्वरित कार्यासाठी पुन्हा एक कोटी मंजूर करणार असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी घोषणा केली आमदार अमोल जावळे यांची प्रमुख पाहुणे  म्हणून कार्यक्रमास विशेष उपस्थित होते त्यांनी मनोगत व्यक्त करतांना धर्मसत्ता   राजसत्ता एकत्र आल्या असून त्यामुळे अशी भव्य कामे संपन्न होत आहे व भाविकांना सुविधा निर्माण होत आहे  संतांचे मार्गदर्शन नेत्यांचा कामाचा आवाका मोठा गतिमान झाला आहे आ.अमोल जावळे यांनी सुद्धा संस्थेचे आवारात पेव्हर ब्लॅक  बसवून व सोलर यंत्रणा याची पूर्तता करणार आहे या मेळाव्याचे व्यासपीठावर मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र महाराज हरणे, दुर्गादास महाराज, नेहते ,भाऊराव महाराज यांचेसह किर्तनकार व हिरालाल चौधरी, निलेश राणे, भागवत विश्वनाथ पाटील, सौ ललिता महाजन, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोळे, हरीश अत्तरडे, जयराम पाटील, सुनील भंगाळे, मनोज महाजन,  जनार्दन भारंबे उपस्थित होते सूत्र संचालन किरण ओंकार चौधरी यांनी केले तर आभार विश्वस्त विजय राघव महाजन यांनी मानले.

No comments