आयएएस अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी समाज कल्याण विभागाचा आयुक्त म्हणून तात्काळ पदभार स्वीकारला..!! सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रत...
आयएएस अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी समाज कल्याण विभागाचा आयुक्त म्हणून तात्काळ पदभार स्वीकारला..!!
सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी तथा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांची पुण्यात समाज कल्याण च्या आयुक्त म्हणून गुरुवारी बदली झाली होती. या संदर्भात सेवा विभागांचे अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांनी गुरुवारी आदेश काढले होते. तसेच त्यांनी या पदाचा तात्काळ पदभार स्वीकारावा असेही आदेशात म्हटले होते. दिपा मुधोळ मुंडे यांनी वर्षभरांपूर्वी पीएमपीचा पदभार स्वीकारला होता. या काळात त्यांनी पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी त्यांनी स्वता: पीएमपीतून प्रवास करून जाणून घेतल्या. तसेच अन्य अधिकाऱ्यांनाही त्यांनी पीएमपीतून प्रवास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्याच कार्यकाळात पीएमपीच्या भालेवाडी चा अकरा वर्षांनी निर्णय घेण्यात आला होता. आता त्यांच्या रिक्त जागी लातूर जिल्ह्यातील जातपडताळणी समितीचे अध्यक्ष पदावर कार्यरत पंकज देवरे यांना तसेच नुकतीच राज्य सरकारकडून अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. आता त्यांची पुण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष पदावर पंकज देवरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची ही पहिलीच जबाबदारी ठरणार आहे.
No comments