वंदे भारत ट्रेन केळी मालधक्का ट्रॅकवर!निंभोरा रेल्वे स्थानकावरील प्रकार रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर ...
वंदे भारत ट्रेन केळी मालधक्का ट्रॅकवर!निंभोरा रेल्वे स्थानकावरील प्रकार
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील निंभोरा रेल्वे स्थानकावरील केळी मालधक्क्यावरील रुळावर वंदे भारत ट्रेन उभी आहे धुळखात...
निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील रेल्वेच्या मालधक्क्या च्या रुळावर वंदे भारत ट्रेन ही दोन-तीन दिवसांपासून धुळखात पडली आहे. अत्यंत हायटेक समजली जाणारी ही सात डब्यांची (कोच)ट्रेन निंभोरा रेल्वे स्थानकावरील केळी मालधक्क्यावर दोन-तीन दिवसापासून पडली असल्याने निंभोरा वासियांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे. ही ट्रेन पाहण्यासाठी निंभोरा गावातील व पंचक्रोशीतील बहुतेक हौशी जणांनी भेट दिली असून ट्रेन समोर सेल्फी व फोटो काढून मोबाईलवर स्टेटस व व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून छायाचित्र पाठवले आहे.
मेक इन इंडिया या सदराखाली भारतीय रेल्वे मंत्रालयाचा एक उपक्रमांतर्गत २०१९ पासून सुरू झालेली ही ट्रेन१८ अशा दुसऱ्या नावाने ही परिचित आहे. ही ट्रेन पूर्णतः भारतीय अभियंतांनी निर्मिती असून संपूर्ण वातानुकूलित आहे १९० किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने धावणारी ही ट्रेन निंभोरा मालधक्क्यावर अळगळीत का पडली आहे ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे ही आतापर्यंत १३६ वंदेभारत रेल्वेगाडी भारतभर सध्या चालत आहे.
{ निंभोरा रेल्वे स्टेशन प्रबंधक}
धर्मराज मीना
# निंभोरा रेल्वे स्थानकाचे रेल्वे स्टेशन प्रबंधक धर्मराज मीना यांना या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी दोन-तीन दिवसापासून ही ट्रेन येथे उभी करण्यात आली असून या संदर्भात मला जास्त माहिती नाही असे सांगितले.


No comments