बीसीए मध्ये दिशा नंदकिशोर अग्रवाल प्रथम धनाजी नाना महाविद्यालयात तृतीय वर्ष चा निकाल रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गा...
बीसीए मध्ये दिशा नंदकिशोर अग्रवाल प्रथम
धनाजी नाना महाविद्यालयात तृतीय वर्ष चा निकाल
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धनाजी नाना महाविद्यालयात तृतीय वर्ष बीसीए पदवी परीक्षेत प्रथम आलेल्या दिशा नंदकिशोर अग्रवाल हिचा सत्कार करताना प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे प्रा. डॉ निखिल वायकोळे यांचे हस्ते बुके देऊन शुक्रवारी दुपारी करण्यात आला.
धनाजी नाना महाविद्यालयात विविध शाखांचे विषयांचे निकाल जाहीर झालेले असून सन 2025= 26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. तृतीय वर्ष बीसीए पदवी परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये महाविद्यालयातून दिशा नंदकिशोर अग्रवाल ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. तिला 3451 मार्क्स मिळालेले असून 9.57 सीजीपीए आहे. द्वितीय कल्याणी चौधरी हिला 3420 मार्क मिळालेले आहे व 9.43 सी जी पी ए. तृतीय लोकेश पाटील 3397 मार्क व 9.43 सी जी पी ए आहे. बीसीए चा महाविद्यालयातील निकाल शंभर टक्के लागलेला असून महाविद्यालयातील प्रा. डॉ निखिल वायकोळे, प्रा. राहुल नारखेडे, प्रा. आरती वर्मा, प्रा नेहा कोल्हे, जागृती चौधरी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालेले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी मार्गदर्शन करून सोडवण्यात आल्या व सराव प्रश्नपत्रिका पेपर विद्यार्थ्यांकडून सोडवण्यामुळे आत्मविश्वास बळकट झाला. परीक्षेत चांगले यश संपादन करता आले असे दिशा अग्रवाल हिने सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाअध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे, चेअरमन लीलाधर चौधरी, सेक्रेटरी एम टी फिरके सर्व प्राध्यापक शिक्षक आणि अभिनंदन केले आहे.
No comments