फैजपूरच्या म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमका...
फैजपूरच्या म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया तर्फे शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांद्वारे शासनाच परिपत्रकानुसार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत असून हे सर्वेक्षण १५ जुलै पर्यंत होणार आहे या सर्वेक्षणाच्या शासनाच्या उद्देशाप्रमाणे १४ वर्षाच्या आतील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण सुरू आहे हे सर्वेक्षण १ ते १५ जुलैपर्यंत
करण्यात येत आहे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेच पाहिजे यासाठी हे सर्वेक्षण शासनामार्फत करण्यात येत आहे.
सदर सर्वेक्षणासाठी म्युनिसिपल हायस्कूल मधील शिक्षक श्री टी एम चौधरी ,एन पी पाटील ए एस नेहेते, व्ही एम भोई, आर एन तडवी, नीलिमा वाघुळदे शिक्षिका ,राजश्री महाजन शिक्षिका, अनिता सिसोदिया शिक्षिका , कल्पना होले शिक्षिका हेमांगी कोल्हे शिक्षिका तसेच ललिता पाटील शिक्षिका हे सर्वेक्षण करीत आहेत.

No comments