विठ्ठल रुक्मिणी महिला दूधउत्पादक सहकारी संस्था निवडणुकीत चेअरमन पदी ज्योती समाधान पाटील बिनविरोध जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (स...
विठ्ठल रुक्मिणी महिला दूधउत्पादक सहकारी संस्था निवडणुकीत चेअरमन पदी ज्योती समाधान पाटील बिनविरोध
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विठ्ठल रुक्मिणी महिला दूध उत्पादक सहकारी संस्था निवडणूक : धरणगाव तालुका व जिल्ह्यात दुग्ध क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या विठ्ठल रुक्मिणी महिला दूध उत्पादक सहकारी संस्था धार ता.धरणगाव पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाच्या सन 2025 ते 2030 यासाठीची निवडणूक दिनांक 19/7/ 2025 रोजी बिनविरोध झाली. विठ्ठल रुक्मिणी महिला दूध उत्पादक संस्था मर्यादित धार निवडणूक साठी सदर संस्थेत दोन पदासाठी एक एक अर्ज दाखल अर्ज झाले होते.
त्यामुळे ते बिनविरोध झाले त्या चेअरमन पदी ज्योती समाधान पाटील व व्हाईस चेअरमन पदी राजलक्ष्मी पंढरीनाथ पाटील यांची सर्वांना मध्ये बिनविरोध निवड करण्यात आली कारण संस्थेचा कारभार हा अत्यंत पारदर्शक आहे सदर निवडणूक प्रक्रिया ही सहकार खात्याचे श्री ए.टी.कांबळे यांनी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले.
सदर संस्थेला सन 2023-24 साठी तालुका प्रथम पारितोषिक मिळाले आहे .सदर संस्थेत म्हैस दूध 1200 लिटर प्रतिदिन संकलणाचा आलेख चांगल्या प्रकारे रचला आहे.त्यासाठी सन 2024-25 ला विकास लक्ष्मी पुरस्काराने नामांकन मिळाले आहे. तसेच यापुढे धार या कार्यक्षेत्रासह पंधराशे लिटर दुधाचे प्रतिदिन संकलन करण्याचे उद्दिष्ट, यावर संस्थेने भर दिला आहे. याप्रसंगी सचिव सौरभ लखीचंद पाचपोळ सर्व संचालक मंडळ समाधान पाटील मयूर कोळी अमोल पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments