आषाढी एकादशीनिमित्त शिक्षणाची दिंडी... वडगाव शाळेचा अनोखा उपक्रम लातूर जि.प्र ( उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा,(दि.०७) ...
आषाढी एकादशीनिमित्त शिक्षणाची दिंडी... वडगाव शाळेचा अनोखा उपक्रम
लातूर जि.प्र ( उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा,(दि.०७) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिभावात न्हालेली शिक्षणाची दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली. या विशेष दिंडीची सुरुवात गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून झाली असून ती हनुमान मंदिरापर्यंत नेण्यात आली.
दिंडीत विद्यार्थ्यांसोबत पालक, ग्रामस्थ तसेच महिला-पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नागनाथ माने यांनी फुगडीच्या तालावर सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गावातील महिला तसेच पुरुषांचाही सहभाग होता. गावातील युवा पिढी तसेच शरद पाटील हे या दिंडीमध्ये सहभागी होते.
चिमुकल्यांच्या "विठ्ठल-विठ्ठल" नामस्मरणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात श्रीमती गुडे पल्लवी मॅडम, श्रीमती साळुंखे सुकुमार मॅडम, शिवाजी बालोरे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. धर्मप्रकाश लखने सर, तसेच दत्तात्रय मस्के सर, ओमप्रकाश झिन्नेवाड सर व आम्रपाली वाळके मॅडम* यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक झाली असून, शाळेतील एक प्रेरणादायी परंपरा म्हणून या दिंडीचे कौतुक होत आहे...
No comments