वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा मुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला :- गुड्डीया पावरा चोपडा शहर पोलिसांत तक्रारी अर्ज केला सादर ...
वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा मुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला :- गुड्डीया पावरा
चोपडा शहर पोलिसांत तक्रारी अर्ज केला सादर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मालापुर ता. चोपडा जि. जळगांव येथील रहिवासी, गुड्डीया पावरा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे कि माझी पत्नी नामे बसंती गुड्डड्या पावरा ही मौजे गोरगावले ता. चोपडा जि. जळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गोरगावले बु. येथे ता. १८/०७/२०२५ रोजी नसबंदी शस्त्रक्रिया करणेकामी गेलेली होती. त्या दिवशी तिचे मेडिकल चेकअप होवून डॉक्टर रमेश धापे व डॉ. मयुरेश माने यांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दि. १९/०७/२०२५ रोजी दाखल करुन घेतले व तिच्यावर शस्त्रक्रिया केली, शस्त्रक्रिया केल्यानंतर तिची लागलीच प्रकृती अतिशय गंभीर झाली व तिला शस्त्रक्रिया झालेल्या जागी रक्तस्त्राव होवू लागला त्यामुळे तिला तात्काळ चोपडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे दाखल करण्यात आले त्यावेळी तिचा शस्त्रक्रिया झालेल्या जागेतुन रक्तस्त्राव होणे बंद होत नव्हते
म्हणुन तेथील डॉक्टरांच्या सूचने नुसार माझ्या पत्नीला जळगाव येथील शासकीय जिला रुग्णालय, जळगाव येथे रुग्णवाहिका मध्ये घेऊन जातांना माझ्या पत्नीची तब्येत अतिशय गंभीर होती. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालय, जळगाव मध्ये दाखल केले व तिच्यावर उपचार सुरु असतांना शस्त्रक्रिया झालेल्या जागेतून रक्तस्त्राव होत होता त्यावेळी तेथील
डॉक्टरांनी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर परत टाके मारले तरी देखील शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर रक्तस्त्राव बंद होत नव्हता व त्यानंतर तिचे पोट फुगू लागले व काही वेळा नंतर तिच्या नाकातुन व तोंडातून रक्तस्त्राव होणे सुरु झाले व ते बंद होत नव्हते व त्यामुळे अशातच तिचा मृत्यू झाला. हे सर्व काही डॉ. रमेश धापे, शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, गोरगावले बु. तसेच डॉ. मयुरेश माने प्रमुख वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र, गोरगावले बु. व त्यांचे सहकारी यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच शासकीय उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथील डॉक्टर तसेच कर्मचारीवृंद व जळगांव शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा मुळेच माझी पत्नी नामे बसंती गुड्डया पावरा हिची वैद्यकीय हत्या होण्यास कारणीभूत झाले आहेत.
तरी वरील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्द योग्य ती चौकशी होवून त्यांच्यावर गुन्हे नोंद करुन त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि मला व माझ्या मयत पत्नीस व मुलांना न्याय मिळवून दयावा. तसेच तात्काळ कार्यवाही न झाल्यास मला नाईलाजास्तव न्याय मिळविण्यासाठी माझ्या मुलाबाळांसहित आपल्या पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसावे लागेल याची नोंद घ्यावी. असे म्हटले आहे तर सदरील तक्रारी अर्जाच्या प्रति वैद्यकीय कागदपत्रांसह
१. मा. तहसिलदार सो. चोपडा
२. मा. पोलिस उप विभागीय अधिकारी सो. चोपडा भाग
३. मा. जिल्हाधिकारी सो. जळगांव
४. मा. आरोग्यमंत्री जो., महाराष्ट्र राज्य, मुंबई
५. मा. गृहमंत्री सो., महाराष्ट्र राज्य, मुंबई
६. मा. पालकमंत्री सो. जळगांव यांचेकडे पाठविणेत आल्याचे ही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे
No comments