adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आर ओ प्लॅनकडे लोणवडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष प्लॅन सुरू होण्यासाठी ग्रामवासियांना प्रहार जनशक्ती पक्ष कडून महापुजेचे आमंत्रण पत्रिका

 आर ओ प्लॅनकडे लोणवडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष  प्लॅन सुरू होण्यासाठी  ग्रामवासियांना प्रहार जनशक्ती पक्ष कडून महापुजेचे आमंत्रण पत्रिका  अमो...

 आर ओ प्लॅनकडे लोणवडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

 प्लॅन सुरू होण्यासाठी  ग्रामवासियांना प्रहार जनशक्ती पक्ष कडून महापुजेचे आमंत्रण पत्रिका 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- तालुक्यात ग्राम लोणवडी येथील ग्रामपंचायत माध्यमातील 15 वित्त आयोगातून आर ओ प्लॅन मागील एप्रिल महिन्यात बसविण्यात येऊन चालू करण्यात आला आर ओ पाणी वापरण्यात गावातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला पाणी भरण्यासाठी असलेल्या दोन हजार लिटरच्या दोन टाक्या मागील दोन महिन्यात अंदाजे सव्वीस टाक्या वापरात आल्या नंतर मागील काही दिवसापासून  नवीनच चालू असलेला आर ओ प्लॅन अचानक बंदच आहे नागरिक खाली कॅन घेऊन रोज तिथं चक्कर मारत असतात आतापर्यंत ग्रामपंचायत त्या टाक्या पाईप टाकून भरत होत्या व गावकरी पाणी वापरत होते ग्राम पंचायत संबंधितांना बंदचे कारण विचारल्यास मोटर दुरुस्तीला टाकली असे बुलथापी कारणे सांगून कानाडोळा करत आहे यांच्या अश्या चुकीच्या वागण्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष वतीने आर ओ प्लॅन चालू करण्यासाठी व ग्रामपंचातला जाग येण्यासाठी आर ओ ची पूजा शनिवार रोजी करण्यात येणार या महापुजेचे आमंत्रण पत्रिकाद्वारे गावातील नागरिकांना प्रहार जनशक्ती पक्ष वतीने देण्यात आले.

No comments