adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उबाठा) चे तहसीलदारांना निवेदन

 शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उबाठा) चे तहसीलदारांना निवेदन  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापुर:- तालुक्...

 शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत शिवसेना (उबाठा) चे तहसीलदारांना निवेदन 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापुर:- तालुक्यात बोगस बियाण्यामुळे त्यातच अत्यल्प पाऊस  झाल्याने सोयाबीन,तुर, मका आदि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याचे पूर्ण वर्ष वाया गेले आहे याचा तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी तहसिलदार यांना शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी दि. 17 जुलै रोजी एका निवेदनाद्वारे केली  आहे.

शेतकऱ्यांना फार्मर आयडी नसल्यामुळे पिक विमा भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे,युती शासनाने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा झालेली नाही सन 23 -24, 24 -25 खरीप पिक विमा अद्याप मिळालेला नाही आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्यासमोर दुसरा पर्याय राहिला नाही त्याला आता शासकीय  आर्थिक मदतीची अपेक्षा आहे, तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणी व तणनाशकाने नुकसान झाले त्या शेतकऱ्यांची आपल्या स्तरावरून कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्यासाठी त्वरित सूचित करावे व त्यांना आर्थिक मदत मिळावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार राहुल तायडे यांना  दिला आहे. निवेदनावर शिवसेना जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत,शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार, युवासेना तालुकाप्रमुख पवन गरुड,किसानसेना तालुकाप्रमुख महादेव पवार, किसानसेना शहरप्रमुख सै.वसीम सै रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, शिवसेना विभाग प्रमुख चांद चव्हाण, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, विनोद पाटील सह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

No comments