Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा १५ जुलै रोजी मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या आवारातच आत्मदहन करणार -:-प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपप्रमुख अजय टप

शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा १५ जुलै रोजी मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या आवारातच आत्मदहन करणार -:-प्रहार जनशक्तीचे जिल्ह...

शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा १५ जुलै रोजी मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या आवारातच आत्मदहन करणार -:-प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपप्रमुख अजय टप 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर शहरात शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. या अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासन कुचकामी ठरत आहे. वाढलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा येत्या १५ जुलै रोजी शहर पोलिस स्टेशनच्या आवारातच आत्मदहन करण्यात येईल, असे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक बुलढाणा यांना प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी प्रसिद्धीस पाठविले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरूआहेत. मात्र या अवैध धंद्यांकडे शहर पोलिस निरीक्षक यांचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात सर्वत्र अवैध धंद्यांनी तोंड वर काढले आहे. ठिकठिकाणी वरलीचे अड्डे असे आहे की खुलेआमपणे वरील घेणार्‍यांकडून चिठ्ठ्या लिहिल्या जात आहेत. तसेच अवैध दारूचा महापूर असून शहरासह महामार्गावरील ढाब्यांवर ज्याठिकाणी परवानगी नाही तेथेही सर्रासपणे दारू उपलब्ध होत आहे. तसेच मलकापूर शहर पो.स्टे. हद्दीत येत असलेल्या खेड्यापाड्यामध्ये सुध्दा अवैध दारूचा महापूर वाहत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने बंदी केलेल्या गुटखा हा सुध्दा मोठ्या प्रमाणात विक्री होत असून शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा येतो कोठून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. 

शहरामध्ये अवैध क्लब आणि इतर अवैध व्यवसाय सुध्दा मोठ्या प्रमाणात फोफावले असून या सर्व अवैध धंद्यांकडे जाणिवपुर्वक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या अवैध धंद्यांमुळे तरूण पिढी ही व्यसनाधिन होवून अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहेत.  गावामध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ठोस अशी पाउले उचलणे गरजेचे असतांना पोलिस प्रशासन कोणत्या कारणाने याकडे दुर्लक्ष करीत आहे. हा प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा आपण आपल्या स्तरावर या अवैध धंद्यांपासून शहर वासियांना दिलासा मिळावा याकरीता योग्य ती पावले उचलून शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे. अन्यथा मला लोकहितास्तव प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जनआंदोलन उभारावे लागेल. यावर काही उपयोग न झाल्यास येत्या १५ जुलै २०२५ रोजी मी मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या आवारातच आत्मदहन करेल. याची सर्वस्व जबाबदारी ही शहर पो.स्टे.चे ठाणेदार व संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांची राहील, असे निवेदनाच्या शेवटी नमूद केले आहे.

No comments