गुऱ्हाळ जिल्हापरिषद शाळेतील "त्या" राडेबाज शिक्षका विरोधात पोलिसांत तक्रार दाखल ? निलंगा (प्रतिनिधी) उत्तम माने (संपादक -:- ह...
गुऱ्हाळ जिल्हापरिषद शाळेतील "त्या" राडेबाज शिक्षका विरोधात पोलिसांत तक्रार दाखल ?
निलंगा (प्रतिनिधी) उत्तम माने
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अखेर मौजे गुऱ्हाळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील "त्या" राडेबाज सहशिक्षक सपकाळे पांडुरंग तुकाराम या शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले सहशिक्षक सपकाळे पांडुरंग तुकाराम हे मागील अनेक वर्षापासून गुऱ्हाळ जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. या शिक्षकावर शाळेत बेशिस्त वर्तन करणे शालेय शिस्तीचा भंग करणे, शाळेत वेळेवर हजर न राहणे, सहकारी शिक्षकांच्या अंगावर मारहाण करण्याच्या उद्देशाने धावून जाणे, शालेय साहित्याची नासधूस करणे, प्रसंगी शाळेतील साहित्य विनापरवानगी घरी घेऊन जाणे कार्यालयीन दस्तऐवज खराब करणे, गावातील राजकारणात सहभागी होणे,पालक वर्गामध्ये शाळेबद्दल अविश्वास निर्माण करणे, चुकीची व खोटी माहिती देऊन पालकांना त्यांच्या पाल्याच्या स्थलांतर दाखले घेऊन जाण्यास प्रवृत्त करणे,षडयंत्री लोकांशी संगनमत करून शाळेबद्दल खोट्या अफवा पसरविणे, या शाळेत काय आहे. असे बेजबाबदार विधाने करून विद्यार्थी व पालकांत गैरसमज निर्माण करणे,दैनदिन अध्यापन वेळापत्रकाप्रमाणे न करता सहकारी शिक्षकाकडे वर्ग सोपवून शाळेच्या प्रांगणात ,खोलीत खुर्ची घालून मोबाईल पाहत बसणे आदी
गैरवर्तनाच्या बाबतीत मुख्याध्यापकांनी जाब विचारला असता त्यांच्याशी तासनतास वितंडवाद घालेने यासह अनेक विविध प्रकारचे गैरकृत्य करणे अशी तक्रार या शाळेच्या मुख्याध्यापकांनी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती निलंगा यांच्याकडे दिलेली आहे.
दिलेल्या तक्रारीत पुढे असे नमूद करण्यात आले आहे.की या राडेबाज शिक्षकाने दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी शाळेच्या मुख्याध्यापकास धक्काबुकी केली, तू माझे काही वाकडे करू शकत नाहीस म्हणून शिवीगाळ करून काही गैर कायद्याचे मंडळीला शाळेच्या कार्यालयात बोलावून घेऊन मुख्याध्यापका विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करून अपमानित केले हा राडेबाज शिक्षक एवढ्यावरच न थांबता शाळेतील दस्तऐवज अस्ताव्यस्त टाकून दिले.व मोठमोठ्याने ओरडून दात खाऊन शिवीगाळ करीत तब्बल पाच तास शाळा कार्यालयात धुडगूस घातला व शालेय कामकाजात अडथळा निर्माण केला.शिवाय विद्यार्थ्यांना अध्यापना पासून वंचित ठेवले असल्याचे पोलिसात दाखल झालेल्या तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की माझ्याविरोधात कोठे तक्रार दाखल केली तर हरामखोरा तुला रस्त्यात भेटेल व तुझे हाडं मोडून तुला ट्रक ने उडवून टाकून जीवे ठार मारण्याची धमकीही दिले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत आता पोलिस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे..
No comments