तेल्हारा ते तऴेगांव वडनेर बस सुरू प्रहारचे संदीप ताथोड यांच्या निवेदनाची दखल काल्पनिक फाईल चित्र अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकां...
तेल्हारा ते तऴेगांव वडनेर बस सुरू प्रहारचे संदीप ताथोड यांच्या निवेदनाची दखल
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा आगाराचे बसेस वाडी मार्गे तऴेगांव पातुर्डा या गावा पर्यंत येत होत्या आणि तऴेगांव (पा)या गावा पासुन परत तेल्हारा जात असत पण तऴेगांव पातुर्डा या गावापासुन फक्त 2 कि मी अंतरावर तऴेगांव वडनेर हे गांव असुन हया गावा पर्यंत बस जात नव्हती विद्यार्थी यांना शाऴेत जाणे करिता अडचण होत होती या करिता
प्रहार अपंग संघटना अकोला जिल्हा कार्याध्यक्ष संदीप ताथोड यांनी 14 जुलै रोजी आगार प्रमुख श्री शर्मा सरांची भेट घेवुन निवेदन दिले आगार प्रमुख यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे मंजुरी घेत आज 29 जुलै रोजी तऴेगांव वडनेर या गावाकरिता बस सेवा सुरू करून दिली, तऴेगांव वडनेर येथील विद्यार्थी यांना शिक्षणाकरिता तसेच नागरिक यांना तालुका चे ठिकाणी जाणे करिता अडचण होत होती, ती आता दुर झाली असुन या बदल तऴेगांव वडनेर येथील विद्यार्थी नागरिक यांचे मध्ये आनंदाचे वातावरण आहे ,
No comments