adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुणेतील मंचरमध्ये कर्तव्यदक्ष महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर हल्ला :- गावगुंडांवर कठोर कारवाईची मागणी..!!

 पुणेतील मंचरमध्ये कर्तव्यदक्ष महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर हल्ला :- गावगुंडांवर कठोर कारवाईची मागणी..!!  सौ. कलावती गवळी ( पुणे जि...

 पुणेतील मंचरमध्ये कर्तव्यदक्ष महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर हल्ला :- गावगुंडांवर कठोर कारवाईची मागणी..!!


 सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मंचर (ता. आंबेगाव) जिल्हा पुणे येथील बाजारतळ्याच्या शेजारी असणाऱ्या ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने पुराचे पाणी आणि बाजारांत घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात (4 जुलै 2025 ) रोजी बातमी करण्यासाठी गेलेल्या कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर वृत्तांकन सुरू असतानाच बिल्डर पांडुरंग मोरडे यांनी खुनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने गुन्हेगारांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एसपी अमोल मांडवे स.पो.नि.श्रीकांत कंकाळ यांना निवेदन देण्यात आले आहे‌‌. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पांडुरंग मोरडे नावाच्या इसमाने नाल्यावर मोठी भिंत बांधून जवळपास 500 ब्रास दगड,मुरूम टाकून भराव करून गाळे बांधण्याचे काम सुरू केल्याने ओढ्यावरील पूल शहरांत पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने वृत्ताकंनासाठी गेलेल्या पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर लाकडी दांडक्याने डोक्यावर पाठीवर आणि कमरेवर हल्ला करून पत्रकार स्नेहा बारवे पहिल्याच फटक्यात जमिनीवर कोसळल्या त्यांना तात्काळ मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी पिंपरी येथे डी.वाय पाटील रुग्णालयात पाठविले या घटनेची नोंद मंचर पोलिसांत वासुदेव काळे यांनी फिर्याद दिली आहे. या पैशाचा माज असणाऱ्या पांडुरंग मोरडेंवर खुनाचा गुन्हा व पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा. पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या पत्रकार क्षेत्रातून संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक पत्रकारांनी रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करीत पुढील प्रमाणे कारवाईसाठी मागण्या केल्या आहेत. 1) हल्लेखोरांवर बीएनएस 198-२ आणि बीएनएस 109 प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा. 2) हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी. 3) गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी. 4) पत्रकार स्नेहा बारवे आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या. पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या जाहीर निषेध करीत अशा मागणी आता पुण्यातील पत्रकारांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाला केल्या आहेत.

No comments