विरावली गावात कृषिकन्यानं कडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन — ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकां...
विरावली गावात कृषिकन्यानं कडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन — ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरावली, 21 जुलै 2025 विरावली गावातील कृषि कन्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचा लाभ घेत गावातील ग्रामस्थांनी आपली प्राथमिक आरोग्य तपासणी करून घेतली, आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या दिशेने हा उपक्रम मोलाचा ठरला.
कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या कृषिकन्यांनी आपल्या शेती आणि आरोग्यविषयक प्रकल्पाअंतर्गत या उपक्रमाची कल्पना मांडली आणि स्थानिक ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे राबवले.
शिबिराचे स्वरूप व तपासण्या
या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर (ब्लड शुगर), हिमोग्लोबिन, बीएमआय, तसेच थायरॉईड करण्यात आली. याशिवाय आरोग्यविषयक सल्ला, योग्य आहार, नियमित व्यायामाचे महत्त्व, व इतर जीवनशैली सुधारणा यावर माहिती देण्यात आली. शिबिरासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात तात्पुरते तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. सकाळी 10 वाजता शिबिराला सुरुवात झाली आणि दुफारी 12 वाजेपर्यंत तपासण्या चालू होत्या. गावातील महिला, वृद्ध, शालेय विद्यार्थी व तरुणांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता.
डॉक्टर व आरोग्य सेवकांचा सहभाग
या उपक्रमात स्थानिक डॉक्टर डॉ. पवन जगताप व ग्रामपंचायत सदस्य ईश्वर अडकमोल यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी प्रत्येक व्यक्तीशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी ऐकून घेतल्या आणि गरज असल्यास पुढील उपचारांची सूचना केली.
डॉ.पवन जगताप म्हणाले, "अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा सहजतेने पोहोचू शकते. वेळच्यावेळी तपासणी होणं गरजेचं आहे. आज अनेक लोकांमध्ये अनियंत्रित साखर किंवा रक्तदाब असल्याचे निदर्शनास आले."
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबिरासाठी आलेल्या ग्रामस्थांनी कृषिकन्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. ग्रामस्थ म्हटले की, “हे शिबिर आमच्यासाठी खूप उपयोगी ठरलं. आम्हाला वेळेवर तपासणी करून घेता आली आणि योग्य सल्लाही मिळाला. अशा उपक्रमांची खूप गरज आहे.”
उपक्रमाचे संयोजक कृषिकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावित, विशाखा सोनावणे, यांनी केले. कृषिकन्यांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. शैलेश तायडे सर, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. म.पी भोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments