adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन. पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा अनुषंगाने चौकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण करण्याची मागणी. अर्धाकृती पुतळा महापालिकेच्या आवारात लावावा.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन. पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा अनुषंगाने चौकास भा...

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन.

पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा अनुषंगाने चौकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरण करण्याची मागणी. 

अर्धाकृती पुतळा महापालिकेच्या आवारात लावावा. 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नगर (दि२१)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा अनुषंगाने या चौकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन चर्चा करताना परिमल निकम, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुनील शिंदे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, नाथा अल्हाट, संजय जगताप ,पोपट जाधव, विजयराव भांबळ, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड , विलास साठे सर, महेश भोसले, सिद्धार्थ आढाव, डी.आर.जाधव, एल.बी. जाधव, अंकुश मोहिते, सुजन भिंगारदिवे, ऋषी विधाते, सागर विधाते, भाऊसाहेब आल्हाट, ओम भिंगारदिवे, येसुदास वाघमारे आदीसह समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, सर्व समाज बांधव व पुतळा समिती सदस्यांच्या वतीने येणाऱ्या 27 जुलै 2025 रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच अनावरण सोहळा या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्याचे आयोजित केलेले आहे. यानिमित्ताने सदर चौकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात यावे व तसा मोठा नाम फलक लावण्यात यावा तसेच सध्या या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे तो रीतसर काढून घेऊन सदर पुतळा हा नंतर महापालिकेच्या आवारात लावण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments