स्वा.सै.श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात "आनंददायी शनिवार "या उपक्रमा अंतर्गत भरली "विठ्ठल नामाची शाळा". च...
स्वा.सै.श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात "आनंददायी शनिवार "या उपक्रमा अंतर्गत भरली "विठ्ठल नामाची शाळा".
चोपडा प्रतिनिधी :रविंद्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक ५ जुलै २०२५ रोजी वर्डी येथे आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयात विठ्ठल नामाचा गजरात विद्यार्थ्यांच्या वारीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मठाधिपती आदरणीय श्री दीनानाथ नाथबुवा सर मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण, मुख्या. श्री एस पी पवार पर्यवेक्षक श्री आर बी साळुंखे या मान्यवरांनी विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले.इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. नयन सुनील पाटील याने विठू माऊली ची वेशभूषा केली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच संतांच्या व वारकऱ्यांच्या भूमिकेत अनेक विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमात उत्साह पूर्ण सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी अभंग व भक्ती गीते सादर केलीत. ज्ञानोबा माऊली, व विठ्ठल नामाच्या गजरात वारीचे आयोजन करण्यात आले. टाळ,मृदंग, व लेझीमच्या तालासुरात विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा पार पाडला. सर्व विद्यार्थी व शिक्षकांसोबत पालकांनीही वारीचा आनंद घेतला. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी नियोजन केले.

No comments