आदिशक्ती संत मुक्ताई पालखीचे मलकापूरात अभूतपूर्व स्वागत. अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:- आषाढी एकादशीच्या निमि...
आदिशक्ती संत मुक्ताई पालखीचे मलकापूरात अभूतपूर्व स्वागत.
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुक्ताईनगर ते पंढरपूर पायी मार्गक्रमण करत संत मुक्ताई ची पालखी पंढरपुरात पोहोचते. यावेळी विठुरायाच्या दर्शना करता महाराष्ट्रातील शेकडो पालख्या घेऊन लाखो भावी भक्त विठ्ठल दर्शनासाठी एकत्रित येतात. विठुरायाच्या दर्शनाने प्रसन्न होऊन मनोभावे या पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात. यातच पंढरपूर वरून येणारी मानाची संत मुक्ताई पालखी आज दि. २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता मलकापूर शहरांमध्ये दाखल झाली. यावेळी शहरवासीयांनी आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोबत सर्व वारकऱ्यांचे स्थानिक ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे भव्य दिव्य स्वागत केले. यावेळी जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून मुक्ताई पालखीचे स्वागत करत अभिवादन केले. या सोहळ्याच्या आयोजनामध्ये शहरवासीयांच्या माध्यमातून मुक्ताई सेवा मंडळ, जिजाऊ फिटनेस क्लब व भाविक भक्त मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेत वातावरण भक्तीमय केले यानंतर शहराच्या मुख्य रस्त्यावरून टाळ मृदंग व भक्तिमय अभंगांच्या सुरात शहराच्या मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत हा पालखी सोहळा महेश भवन येथे भक्तांच्या दर्शनाकरिता व वारकऱ्यांच्या महाप्रसादाकरिता विसावला. या निमित्ताने मागील ६० वर्षांची परंपरा कायम ठेवत येथील व्यवहारे परिवाराच्या वतीने सर्व वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
त्यानंतर मुक्ताई पालखी शहरवासी यांच्या दर्शनाकरिता या ठिकाणी काही काळ थांबली पुढे छत्रपती शिवाजीनगर मार्गे ही पालखी सोहळा मुक्ताईनगर ते बस स्थान पावला. आज रात्री मुक्कामानंतर उद्या पहाटे हा पालखी सोहळा स्वगृही म्हणजेच मुक्ताईनगर येथे पोहोचेल अशी माहिती मुक्ताई सेवा मंडळ व जिजाऊ फिटनेस क्लबचे सदस्य ह भ प नितीन महाराज यांनी दिली.
• विठुरायाचे दर्शना घेऊन आलेल्या वारकऱ्यांच्या स्वागत करता शेकडो भाविक भक्तांची हजेरी.
शहरातील विविध गणपती मंडळे दुर्गा मंडळ व प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते त्याचा राजकीय नेते मंडळी या पालखी सोहळ्याच्या दर्शनाकरिता आवर्जून उपस्थित राहिली सोबतच माता-भगिनी मान्य नगरवासीय सुद्धा यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळेल.
• जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करून माऊलीचे झाले जल्लोषात स्वागत.
मुक्ताई सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुक्ताई पालखी स्वागत सोहळ्याप्रसंगी वारकऱ्यांवर जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून करण्यात आले शहरात ठीक ठिकाणी शुभेच्छा बॅनर व रांगोळी काढून वारकऱ्यांचे अभिवादन करण्यात आलेले दिसले.
• टाळ मृदुंग व पावली खेळत शहरवासीयांनी भक्तिमय केले वातावरण.
ग्रामीण भागातील विविध भजनी मंडळ तथा टाळकरी यांच्या माध्यमातून विठुरायाचा जयजयकार करत मुक्ताईच्या अभंगांनी ही पालखी पुढे सरकत शहरात आनंदमय भक्ती वातावरण निर्माण करत असल्याचे चित्र सर्वांनी अनुभवले.
गोविंद विष्णू महाजन जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही मुक्ताई पालखी सोहळ्यात घेतला सहभाग
शेकडो किलोमीटरच्या पायी प्रवासानंतर शहरात दाखल झालेल्या या पालखी सोहळ्यात शहरवासीयांसोबतच येथील गोविंद विष्णू महाजन ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मुक्ताई पालखीचे स्वागत करत मनोभावे वारकऱ्यांचे दर्शन घेतले
No comments