adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बहुचर्चित खुन प्रकरणातील फरार आरोपीस पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश.

 बहुचर्चित खुन प्रकरणातील फरार आरोपीस पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (प्रतिनिध...

 बहुचर्चित खुन प्रकरणातील फरार आरोपीस पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश.


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बहुचर्चित सिताराम सारडा विद्यालयातील खुन प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. तोफखाना पो.स्टे. येथे गु.रजि.नं. 664/2025, बी.एन.एस.कलम 103 (1) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे वसिम हमीद शेख (रा.सर्जेपुरा, कैलारु कॅम्प,ता.जि अहिल्यानगर) हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता व दरवेळी पोलीसांना वेळोवेळी हुलकावनी देत होता,तो मिळुन येत नव्हता.त्याचा शोध घेणेकामी तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र पथक तयार केले होते.सदर आरोपी हा पोलीसांना दरवेळी हुलकावणी देत असे.परंतु दि.15 जुलै 2025 रोजी पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,आरोपी नामे वसिम हमीद शेख हा मुकुंदनगर परिसरात त्याच्या नातेवाईकांकडे येणार आहे.लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार हे आरोपीचा शोध घेणे कामी मुकुंदनगर परिसरात रवाना झाले असता गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आरोपीचा मुकुंदनगर परिसरात शोध घेत असताना आरोपी यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्याचा पाठलाग करुन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे सो,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे चार्ज तोफखाना पो.स्टे, श्री.गणेश वारुळे सहा.पोलीस निरीक्षक तोफखाना पो.स्टे,तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कॉ.सुनिल चव्हाण, अब्दुलकादर इनामदार, योगेश चव्हाण, भानुदास खेडकर, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, कपिल गायकवाड, पो.कॉ पाखरे, भागवत बांगर, म.पो.ना.जिजा खुडे यांनी केली आहे.

No comments