adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नानजी भाई ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा व समाजसेवेचा संदेश सिद्ध योगीराज लक्ष्मणगिरी महाराज संजीवन समाधी येथे भव्य कार्यक्रम संपन्न

  नानजी भाई ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा व समाजसेवेचा संदेश सिद्ध योगीराज लक्ष्मणगिरी महाराज संजीवन समाधी येथे भव्य कार्यक्रम संपन्न ...

 नानजी भाई ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा व समाजसेवेचा संदेश

सिद्ध योगीराज लक्ष्मणगिरी महाराज संजीवन समाधी येथे भव्य कार्यक्रम संपन्न 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कोपरगांव तालुक्यातील वावी येथील सिद्ध योगीराज सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात सदगुरु रामगिरी महाराज सेवा संस्थान यांच्या वतीने भव्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते थोर समाजसेवक नानाजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते करण्यात आलेले ध्वजारोहण व त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने दिलेला समाजसेवेचा संदेश.

या प्रसंगी बोलताना नानाजीभाई ठक्कर म्हणाले की, "येथील मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून यासाठी योग्य ती मदत केली जाईल. या पवित्र स्थळी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांनी मोफत सेवा करावी. अनेक कीर्तनकार सेवा करतात, परंतु त्यासाठी मोठ्या पाकिटांची मागणी होते. याऐवजी जो मनाने देतो, त्याचे मानधन स्वीकारून धर्मप्रसार होणे ही काळाची गरज आहे." ते पुढे म्हणाले की, "हाच वारसा येथील हरिभक्त परायण गिरी महाराजांनी सुरू केलेला हा सेवा कार्याचा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. मुंबई विभागातून साई पालख्या याच मार्गाने जातात आणि त्यांना येथे विश्रांती व निवारा मिळावा यासाठी मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत संयुक्तरित्या प्रयत्नशील आहेत." एन. के. टी. ग्रुपच्या समाजहिताच्या कार्याचा उल्लेख करत नानजी भाई ठक्कर ठाणावाला म्हणाले की, “हिंदुस्थानात ७० ते ८० हजार मंदिरे बांधली गेली, मात्र समाज व संप्रदाय या दोहोंचा समतोल ठेवून प्रपंच करत परमार्थ केला तर त्यातून खऱ्या जीवनाचा आनंद मिळतो. हा मूलमंत्र आम्ही पुढे नेत आहोत. येथील वारकरी संप्रदाय या कार्यात निश्चितच पुढाकार घेईल.”

कार्यक्रमादरम्यान नानाजीभाई ठक्कर यांच्या हस्ते शिवलिंगाचे विधिवत पूजन करण्यात आले आणि त्यांनी समाजसेवेचा संदेश देत उपस्थितांना प्रेरित केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, संघाचे प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, प्रगतशील शेतकरी शिवाजी मामा नाईकवाडी, एन. के. टी. ग्रुपचे विश्वस्त पांडे, अहील्यानगरचे नामवंत उद्योजक गणेश दादा भांड, ह.भ.प. कृष्णा महाराज गिरी, कीर्तन केसरी ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी वावीकर, शिवसेना अध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख संपत जाधव, सरपंच विजय काटे, माजी सरपंच संदीप राजे भोसले, गणेश वेलजाळी, सर्जेराव वाजे, सुरेश नाना वेलजाळी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त संस्थेच्या वतीने थोर समाजसेवक नानाजीभाई खिमजीभाई ठक्कर यांचा पुणेरी पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सोहळा धार्मिक भावनेतून आणि सेवाभावातून संपन्न झाला असून येथील मंदिर लवकरच भाविकांसाठी एक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments