सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला... मावळते आयुक्त सचिन कलंत्रे नेहमीच प्रयत्नशील राहिले..!! स...
सौम्या शर्मा चांडक यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला... मावळते आयुक्त सचिन कलंत्रे नेहमीच प्रयत्नशील राहिले..!!
सौ. कलावती गवळी ( अमरावती जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमरावतीचे महानगरपालिकेचे नूतन आयुक्त म्हणून सौम्या शर्मा ( चांडक ) यांनी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून मावळते आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडून पदभार स्विकारला यावेळी मावळते आयुक्त यांनी सचिन कलंत्रे यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला, मावळते आयुक्त सचिन कलंत्रे यांनी अमरावती महानगरपालिकेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, शहरांतील विकास कामांना आणि सर्व सामान्य जनतेला त्यांनी प्रथम न्याय दिला. त्यांची बदली पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये उपसंचालक म्हणून बदली झाली आहे. अमरावतीच्या नूतन आयुक्त सौम्या शर्मा (चांडक ) या 2018 बॅचच्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तर नागपूर सिटी प्रकल्पात सीईओ म्हणून कार्यरत होत्या. यावेळी नूतन आयुक्त पुढे म्हणाल्या... कायद्याच्या चाकोरीत राहून नागरिकांच्या समस्या लोकप्रतिनिधींचे प्रश्न गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आपण सर्वांनी एक नव्या उर्जेने गतिमान काम करणे अपेक्षित आहे. गती आणि चांगली कामगिरी या तीन गोष्टींवर प्रत्येकाने कार्य करावे अशी अपेक्षा नूतन आयुक्त सौम्या शर्मा ( चांडक ) यांनी व्यक्त केली आहे
No comments