ऑबट श्रीमती मायादेवी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून सायकल वाटप ! श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रयत शिक्षण संस...
ऑबट श्रीमती मायादेवी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून सायकल वाटप !
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रयत शिक्षण संस्थेच्या भिंगार (जि.अहिल्यानगर) येथील श्रीमती ऑबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल चे माजी विद्यार्थी अक्षय रमेश थोरात यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून या विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले. भिंगार येथील श्रीमती मायादेवी ऑबट विद्यालयात नुकताच सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे हे होते. तर व्यासपीठावर रमेश थोरात, अक्षय थोरात, संध्या थोरात, मुकुल थोरात ,रेवती थोरात मनीष गायकवाड, पूजा साळवे, यशराज उबाळे, सागर साळवे, नितीन गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी १२ विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या सायकलींचं वाटप करण्यात आले. अक्षय थोरात म्हणाले की, सामान्य घरातील माझा जन्म असून शाळेबद्दलच्या आपुलकी पोटी या सायकली मी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून नाव कमवावे. प्रमोद तोरणे म्हणाले की, पैशाने श्रीमंत खूप असतात परंतु देणारे कमी असतात शाळा दानशूरांना कधीच विसरणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याचं आयोजन सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव रेवगडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका कविता शिंदे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments