जिल्ह्यातून हददपार असणारा सराईत आरोपीस जेरबंद एमआयडीसी पोलीसांची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि...
जिल्ह्यातून हददपार असणारा सराईत आरोपीस जेरबंद एमआयडीसी पोलीसांची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१०):-अहिल्यानगर जिल्हयातुन एक वर्षाकरीता हददपार असणा-या सराईत आरोपीस जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.दि.१० जुलै २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि.माणिक बी. चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करणारा तडीपार आरोपी नामे वसीम कादीर कुरेशी हा लामखेडे चौक एमआयडीसी येथे फिरत आहे अशी गोपनिय माहिती मिळाल्याने तपास पथकाचे अमंलदार यांना सदर आरोपीस सपोनि.चौधरी यांनी जावुन पकडण्यास सांगीतले.त्यावरुन पथकाने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता तडीपार आरोपी नामे वसीम कादीर कुरेशी हा लामखेडे चौक एमआयडीसी येथे दिसुन आला. त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला.त्याचा पाठलाग करुन तपोलिसांनी पकडले,त्याचे विरुदध एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ५२४/२०२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,श्री.अमोल भारती अति. चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शानाखाली सपोनि. माणिक बी.चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई.विनोद परदेशी, सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ. शैलेश रोहोकले,पोहेकॉ.सचिन आडबल,पोकॉ.किशोर जाधव, पोकॉ.नवनाथ दहिफळे,पोकॉ. शानेश्वर आघाव यांनी केली आहे.
No comments