गुरूपौर्णिमेचा प्रकाश विरावली गावात दरवळला भरत कोळी यावल ता.प्र . (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि.१० जुलै २०२५ रोजी डॉ. उल्हास पाटील कृष...
गुरूपौर्णिमेचा प्रकाश विरावली गावात दरवळला
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.१० जुलै २०२५ रोजी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषी कन्यांनी "गुरुपोर्णिमा" हा दिवस भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण विरावली गावात मोठ्या उत्साहात साजरा केला.
या विशेष दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका योगेशवरी धनगर मॅडम, तसेच शिक्षिका सुवर्णा पाटील मॅडम आणि इतर सर्व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलाने झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना पुष्पगुच्छ, कार्ड्स देऊन वंदन केले आणि त्यांच्या कार्याची मनापासून प्रशंसा केली. काही विद्यार्थ्यांनी गुरुप्रेमावर आधारित भाषणे आणि कविता सादर केल्या.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना सद्गुणांची कास धरण्याचा संदेश दिला.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि संस्कार होत असल्याचे दृश्य होते.हा कार्यक्रम डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावीत, विशाखा सोनवणे, धनश्र्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे आणि ऐश्वर्या सोनवणे या विद्यार्थिनींनी आयोजित केला होता. कृषी कन्यांनी शाळेतील प्रत्येक शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शेवटी सर्वांनी सामूहिकरित्या "गुरू ब्रह्मा, गुरू विष्णु..." हा श्लोक म्हणत गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शैलेश तायडे, प्रा . ब. एम. गोंशेट्वाड व प्रा. पी. एम भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments