Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज : प्राचार्य विनायक मेथवडे रयत शिक्षण संस्था कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देणारी पहिली शिक्षण संस्था

  कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज : प्राचार्य विनायक मेथवडे र यत शिक्षण संस्था कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देणारी पहिली शिक्षण संस्था अजिजभा...

 कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज : प्राचार्य विनायक मेथवडे

यत शिक्षण संस्था कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देणारी पहिली शिक्षण संस्था


अजिजभाई शेख / राहाता

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रयत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नाविण्याचा ध्यास घेणारी संस्था असून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देणारी पहिली संस्था आहे. स्वविकासाबरोबरच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले. 

प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच इयत्ता बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विनायक मेथवडे हे होते तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पालक प्रतिनिधी कल्पना शेळके व तुषार थेटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी सीईटी पॅटर्नवर विश्वास मोहिते, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर शाहिस्ता शेख, उपप्राचार्य अलका आहेर, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पालक प्रतिनिधी कल्पना पेंढारे व श्रेया घोगरे यांनी सीईटी, नीट व जेईई परीक्षांच्या उत्कृष्ट निकालाबद्दल कौतुक केले. प्राचार्य विनायक मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, गेल्या तीन वर्षापासून एमजी महाविद्यालयाने सीईटी व नीट परीक्षेत आपला स्वतःचा एक पॅटर्न तयार केला असून रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीचे अधिकचे प्रयत्न केले जात आहे. सीईटी, नीट अभ्यासक्रमाबरोबरच रयत स्वतःची हजारो एम.सी.क्यू प्रश्नांची पतपेढी आणि युट्युबवर शेकडो व्हिडिओ लेक्चर्स तयार करत आहे. महाविद्यालयातील तासिकांचे अध्यापन इंटरॅक्टिव्ह बोर्डवर प्रभावीपणे घेतले जात आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर आभार देवेश आहेर यांनी मानले.

वृत्त विशेष सहयोग

डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस 

 श्रीरामपूर - 9561174111

No comments