वलांडी शहरातील दारू दुकाने बंद करण्यात यावे अन्यथा अधिकाऱ्यांची गाढवावर बसवून वरात काढण्याचा इशारा... लातूर जि.प्र (उत्तम माने) (संपादक -...
वलांडी शहरातील दारू दुकाने बंद करण्यात यावे अन्यथा अधिकाऱ्यांची गाढवावर बसवून वरात काढण्याचा इशारा...
लातूर जि.प्र (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज (दि. ७ ) रोजी प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले देवणी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भोसले कामगार आघाडी तालुकाप्रमुख अंतेश्वर सूर्यवंशी व वलांडी गावातील सर्व महिला यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी लातूर व दारूबंदी अधिकारी लातूर यांना निवेदन देऊन वलांडी शहरातील सर्व अधिकृत व अनधिकृत दारू दुकाने तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीने दारूबंदी अधिकारी यांच्या तोंडाला काळीपासून गाढवावर दिंड काढण्याचा इशारा जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले यांनी त्यावेळी दिला या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत
दारूमुळे अनेक महिला विधवा झालेल्या असून लहान लहान मुलं दारूच्या आहारी गेलेले आहेत म्हणून शहरातील सर्व दारू दुकाने हद्दपार करण्यात यावे यासाठीच्या जिल्हाधिकारी व दारूबंदी अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ दारू बंद करण्यात यावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीने बच्चुभाऊ कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले यांनी दिला त्यावेळी उपस्थित जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी जाधव कामगारा आघाडीचे पदाधिकारी व महिला उपस्थित,,
No comments