फैजपूर प्रांताधिकारींना अरेरावीची भाषा करणाऱ्या निलेश राणे यांचा पोलीस पाटील संघटनेकडून जाहीर निषेध इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ...
फैजपूर प्रांताधिकारींना अरेरावीची भाषा करणाऱ्या निलेश राणे यांचा पोलीस पाटील संघटनेकडून जाहीर निषेध
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील प्रांतअधिकारी यांच्यासोबत झालेल्या अरेरावीच्या घटनेचा यावल तालुका पोलीस पाटील संघटनेने तिव्र शब्दांत निषेध केला आहे ही घटना लोकशाही आणि प्रशासकीय व्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर असून संबंधित भाजपाचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे उर्फ ( पिंटू राणे ) यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावल तालुका पोलीस पाटील संघटनेने केली असून असे निवेदन ही देण्यात आले आहे.
फैजपूर येथे काही व्यक्तींनी प्रांतअधिकारी यांच्यासोबत असभ्य वर्तन करत अरेरावी केली होती शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याच्या आणि अधिकाऱ्याला धमकावण्याच्या या प्रकरणामुळे शासकीय वर्गात संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच यावल तालुका पोलीस पाटील संघटनेने एक बैठक घेऊन सदरील घटनेचा निषेध करणारा ठराव मंजूर केला याप्रसंगी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रशासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक असून त्यांच्या कामात अडथळा आणणे किंवा त्यांच्याशी असभ्य वर्तन करणे हे निंदनीय आहे अशा घटनांमुळे शासकीय कामकाजावर नकारात्मक परिणाम होतो आणि शासकीय अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचते.
यावल तालुका पोलीस पाटील संघटनेने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंती ही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शासकीय कामकाज पारदर्शकता आणण्यासाठी अशा गैरकृत्यांना आळा घालणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पवन चौधरी यावल तालुका अध्यक्ष किरण पाटील यावल तालुका पुर्व विभाग अध्यक्ष विशाल जवरे जिल्हा संघटक सुरेश खैरनार गोकुळ सपकाळ चंदन पाटील दिनकर कोळी धनराज बाविस्कर हरिश चौधरी दीपक पाटील प्रसन्न कुमार पाटील संतोष सुरवाडे प्रफुल्लता चौधरी विठ्ठल कोळी प्रियंका पाटील दिपाली धनगर अर्चना पाटील मीना चव्हाण प्रमोद तावडे नरेश मासोळे कैलास बादशहा आदींसह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील हजर होते.
No comments