adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हेदअंबा पाड्यावर स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गैरसोय

 हेदअंबा पाड्यावर स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गैरसोय  प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र...

 हेदअंबा पाड्यावर स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गैरसोय 



प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर-:- मरणानंतरही मरणयातना संपत नसल्याचे खेदजणक दृश्य त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाहण्यास मिळत आहेत.वेळुंजे ग्रामपंचायत हद्दीतील हेदअंबा येथे आदिवासी बांधवांसाठी स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात एखाद्याचा मृत्यू झाला तर ताडपत्रीच्या आधारे रानमाळावर नेऊन उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागते हेदअंबा पाड्यावर स्मशानभूमी नसल्यामुळे पावसाळ्यात भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची नातेवाईकांवर वेळ येते मुसळधार पाऊस असल्यावर तासण तास उघड्यावर थांबावे लागले अनेक अडचणी येतात.ताडपत्री लावून कसरत करावी लागते 183 लोकवस्ती असलेल्या हेदअंबा पाड्यातील आदिवासी नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागते येथील स्मशानभूमीचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे आदिवासींच्या योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना मृत्यूनंतरही आदिवासी परफट थांबत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

No comments