adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखेर ती वंदे भारत रेल्वे गाडी नागपूर कडे रवाना ! फोटोसेशन सेल्फी प्रेमींचा हिरमोड..

 अखेर ती वंदे भारत रेल्वे गाडी नागपूर कडे रवाना ! फोटोसेशन सेल्फी प्रेमींचा हिरमोड.. रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 अखेर ती वंदे भारत रेल्वे गाडी नागपूर कडे रवाना ! फोटोसेशन सेल्फी प्रेमींचा हिरमोड..


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर तालुक्यातील निंभोरा येथील रेल्वे स्थानकावरील केळी वॅगन च्या मालधक्क्यावर दोन तीन दिवसांपासून उभी होती ती वंदेभारत रेल्वे ट्रेन अखेर  नागपूर च्या दिशेने रवाना झाली 

निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील रेल्वेच्या मालधक्क्यावर वंदे भारत ट्रेन ही दोन-तीन दिवसांपासून धुळखात पडली आहे. अशी  वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून अत्यंत हायटेक समजली जाणारी ही सात डब्यांची (कोच)ट्रेन निंभोरा रेल्वे स्थानकावरील केळी मालधक्क्यावर दोन-तीन दिवसापासून पडली असल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून लागलीच दि.१२ रोजी सकाळी ११:०० वाजता नागपूरकडे मार्गस्थ झाल्याचे कळाले त्यामुळे  वंदे भारत ट्रेन सोबत सेल्फी काढणारे हौशी नवतरुणांचा हिरमोड झाला  निंभोरा वासियांसाठी कुतूहलाचा विषय  ठरलेली. ही ट्रेन पाहण्यासाठी निंभोरा गावातील व पंचक्रोशीतील बहुतेक हौशी जणांनी भेट दिली असून ट्रेन समोर सेल्फी व फोटो काढून मोबाईलवर स्टेटस व व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून  व्हायरल झालेली ट्रेन ही नेशन महाराष्ट्र ला बातमी आल्याने अधिकच प्रसिद्ध झाली व आज नवतरुणांनी हिला पाहण्यासाठी निंभोरा धक्क्यावर गर्दी केली असता अखेर ती शनिवारी सकाळी ११:०० वाजता मार्गस्थ झाली.

      मेक इन इंडिया या सदराखाली भारतीय रेल्वे मंत्रालयाचा एक उपक्रमांतर्गत २०१९ पासून सुरू झालेली ही ट्रेन१८ अशा दुसऱ्या नावाने ही परिचित आहे. ही ट्रेन पूर्णतः भारतीय अभियंतांनी निर्मिती असून संपूर्ण वातानुकूलित आहे १९० किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने  धावणारी हायटेक ही ट्रेन निंभोरा मालधक्क्यावर अळगळीत का पडली आहे ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला होता. ही ट्रेन येथे का उभी आहे ती मेंटेनेससाठी आणली आहे का की ट्रायल दरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यामुळे ठेवण्यात आली आहे असे एक ना अनेक प्रश्न मनात निर्माण होते मात्र याविषयी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. आतापर्यंत १३६ वंदेभारत रेल्वेगाडी भारतभर सध्या चालत आहे.

No comments