खर्दे बु!! येथे ५० फूट खोल विहिरीत पडली हरीण: वनविभाग व ग्रामस्थांनी सुखरुप काढले बाहेर धरणगाव तालुका प्रतिनिधी - राजु बाविस्कर (संपादक -:-...
खर्दे बु!! येथे ५० फूट खोल विहिरीत पडली हरीण: वनविभाग व ग्रामस्थांनी सुखरुप काढले बाहेर
धरणगाव तालुका प्रतिनिधी - राजु बाविस्कर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव - खर्दे बु येथे ५० फुट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाला गावकरी, वनविभाग यांनी सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे या हरणाला जीवनदान मिळाले.
खर्दे बु येथिल शेतकरी, राजेंद्र नथ्थु पाटील यांच्या शेतात ५० फूट खोल विहीर आहे, विहिरीला पाणी नाही तसेच विहिरीच्या वर लोखंडी जाळी लावलेली नसल्यामुळे यात एक हरीण पडले हरीण विहिरीत पडल्याची माहिती, राजेंद्र नथू पाटील यांनी पोलीस पाटील यांना दिली, पोलिस पाटील राजेंद्र केंदळे यांनी वनपाल सतिष ठेलार यांना कळविले वनरक्षक सुनील थोरकर, वनमजुर शांताराम पाटील, गजानन सौंदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली गावातील, समाधान कोळी, सुपडू रामा पाटील, साहेबराव कोळी, राकेश पाटील, परशुराम पाटील, समाधान पाटील, मनोज पाटील, जिजाब बाविस्कर, यांच्यासह आदींनी वनविभाग कर्मचाऱ्यांना हरिण काढताना मोलाची मदत केली त्यामुळे हरणाचे प्राण वाचले,
दरम्यान वनपाल सतिष ठेलार यांनी आव्हान केले की, उघड्या शेतकऱ्यांनी लोखंडी जाड्या लावाव्यात विहीर भुईसपाट असल्यास भिंत बांधावी, जोरदार पाऊस झाल्याने अशा विहिरीच्या आजूबाजूंनी काठालगत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असतात झाडे झुडपे दाट झाली की विहीर दिसत नाही वन्यप्राणी चरण्यासाठी जंगल सह शेताकडेही येतात, वन्य प्राणी चपराईने पळतात परिणामी ते विहिरीत पडतात, अनेकदा विहिरीत पडल्याने ते जखमी होतात तसेच त्यांच्या मृत्यूही होतो त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या परीने विहिरीवर संरक्षण जाळे लावावीत.
No comments