वार्ड नंबर 3 मधील काँक्रिट काम नालीसहीत करण्यात यावे प्रहार कार्यकर्त्यांची लोणवडी ग्रामपंचायतिला निवेदनाद्वारे मागणी 15 दिवसात काम मार्गी ...
वार्ड नंबर 3 मधील काँक्रिट काम नालीसहीत करण्यात यावे प्रहार कार्यकर्त्यांची लोणवडी ग्रामपंचायतिला निवेदनाद्वारे मागणी
15 दिवसात काम मार्गी न लागल्यास प्रहार जनशक्ती पक्ष घेणार आंदोलनाची भूमिका
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- ग्रामपंचायत लोणवडी येथे प्रहार कार्यकर्त्यां समवेत निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केले आहे की वार्ड नंबर 3 मधील वस्तीतील खड्डे सांडपाण्याचे साचले आहे साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू मलेरिया,डायरीया,थंडी तापाचे प्रमाण वाढले असून लहान मुलांचे,नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे त्यांच्या आरोग्याची काही जीवित हानी झाल्यास याला जबाबदार शासन राहील याची नोंद घ्यावी ग्रामपंचायतने 2024- 2025 च्या कृती आराखड्यात काम घेतले आहे ते गजानन भारंबे यांच्या घरापासून ते गावकुस नालीपर्यंत काँक्रिट काम नालीसहीत येत्या 15 दिवसात पूर्ण करावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार कार्यकर्ते राहुल बावस्कार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments