आगामी सण उत्सव एकोपा गुण्यागोविंदाने व शांततेत साजरे करा ~एसडीपीओ अनिल बडगुजर रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) र...
आगामी सण उत्सव एकोपा गुण्यागोविंदाने व शांततेत साजरे करा ~एसडीपीओ अनिल बडगुजर
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील निंभोरा बु येथे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर निंभोरा येथील कृषी विद्यालयाच्या प्रांगणात निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत नव्याने आलेले पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली या बैठकीत
गणपती उत्सव ,दुर्गा उत्सव पोळा यासह सर्व सण उत्सव शांततेत साजरे करा असे प्रतिपादन फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालेले पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी व्यक्त केले. यासोबतच निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी शांतता सभेमध्ये प्रास्ताविक व स्वागत हरिदास बोचरे ,पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील, यांनी केले. या बैठकीत गणपती उत्सवाचे पदाधिकारी गावातील मान्यवर शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील, पत्रकार, राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याप्रसंगी फैजपूर पोलीस विभागीय अधिकारी अनिल डी. बडगुजर, स पो.नी हरिदास बोचरे,ललित कोळंबे राजीव बोरसे,अनिल बराटे दस्तगीर खाटीक युनूस अमन खान,प्रवीण धुंदले , कांतीलाल गाढे,सुनील कोंडे,विजय सोनार, पो.पा योगेश पाटील मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी नव्याने आलेले पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांचा पंचक्रोशीतील मान्यवरांनी व हद्दीतील पत्रकार, पो .पाटील, व कृषी तंत्र विद्यालयातर्फे स्वागत केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांनी केले तर दर्शन गोपनीय पोलीस अमोल वाघ, सुरेश पवार यांनी मानले, यावेळी कृषी तंत्र विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच पोलीस व होमगार्ड यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments