बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखेमार्फत २ ऑगस्ट ‘मराठी बालनाट्य दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला...! धुळे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत...
बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखेमार्फत २ ऑगस्ट ‘मराठी बालनाट्य दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला...!
धुळे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था असून, या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात यावा असे बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्षा ऍड. नीलम ताई शिर्के सामंत यांच्या मार्गदर्शनातून हा मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्यात आला.
बालनाट्यचा पहिला व्यावसायिक प्रयोग २ ऑगस्ट १९५९ रोजी झाला होता इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या परवाला सुरुवात झाली आणि हाच तो दिवस बालनाट्य दिवस बालरंगभूमी मार्फत सर्वत्र बालनाट्य दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
धुळे जिल्हा शाखेमार्फत चार शाळांमध्ये बालरंगभूमी परिषद कार्य आणि उद्देश यावर चर्चा, बालनाट्य विषयावर मुलांच्या चर्चा व मनोगत, बालनाट्य लेखन दिग्दर्शन प्रकाशयोजना वेशभूष संगीत व अभिनय कार्यशाळा, उस्फुर्त नाटुकली सादरीकरण, बालप्रेक्षक नोंदणी अभियान हे सर्व उपक्रम राबविण्यात आले.
बालरंगभूमी धुळे जिल्हा शाखा यांच्या वतीने धुळे ग्रामीण मधील कै. मो. ता. पाटील माध्यमिक हायस्कूल कुंडाणे(वार) या शाळेत मुख्याध्यापक श्री. पितांबर माळी व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत एकूण १२० विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. धुळे शहरी भागात हायस्कूल कृष्णनगर, धुळे येथे मुख्याध्यापक श्री. कैलास गर्दे व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत एकूण ४० धुळे जिल्ह्याच्या अति दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत फार मज्जा केली. त्यानंतर शासकीय विद्यानिकेतन, धुळे येथे कुलप्रमुख सौ. प्रतिभा ठाकूर व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत ९५ विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा आनंद घेत राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभाग घेत आणि पारितोषिके जिंकू जणू असा प्रणच घेतला. तसेच दुपार सत्रात जो. रा. सिटी हायस्कूल, धुळे येथे मुख्याध्यापक श्री. पाठक सर व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत एकूण १२४ विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
यावेळी नटराज व सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यशाळेस सुरुवात झाली. सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांना बालनाट्य गोडी कशी लावता येईल , विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांच्याकडून उस्फुर्त नाट्य बसवून घेऊन त्याचे सादरीकरण घेण्यात आले. सहभागी शाळांना बालनाट्याचे पुस्तके भेट देण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना बालरंगभूमी बालप्रेक्षक होण्याबद्दल माहिती देऊन त्यांची बालप्रेक्षक नोंदणी करण्यात आली. यावेळी बालरंगभूमी धुळे शाखेचे अध्यक्ष माननीय सिद्धांत मंगळे यांनी आपल्या भाषणातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बाल प्रेक्षक म्हणून नोंदणी करावी तसेच बालरंगभूमी परिषदचे सभासद होऊन वर्षभरात चालणाऱ्या उपक्रमामध्ये विविध शाळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद धुळे जिल्हा शाखेचे अध्यक्ष सिद्धांत मंगळे, कार्याध्यक्ष हर्षल परदेशी, उपाध्यक्ष ऋषभ अहिरे, उपाध्यक्ष राहुल मंगळे, प्रमुख कार्यवाह सुजय भालेराव, सहकार्यवाह सुनीता दुसाने, कोषाध्यक्ष ज्योती चौहान तसेच कार्यकारणी सदस्य हर्षल बागुल, जगदीश चव्हाण, कुणाल खैरनार, चेतन उपाध्याय, मेधा कुलकर्णी, सागर चांगरे तसेच विद्या कुलकर्णी, निकिता नागपुरे यांनी परिश्रम घेतले.


No comments