यावल महाविद्यालयात तिरंगा प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प...
यावल महाविद्यालयात तिरंगा प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे "हर घर तिरंगा" मोहिमेंतर्गत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ऑनलाईन झालेल्या या स्पर्धेत एकूण ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.. स्पर्धेत एफ वाय बी ए ची विद्यार्थिनी श्रद्धा नितीन बडगुजर हिने प्रथम क्रमांक, एस वाय बी एस सी ची विद्यार्थिनी गायत्री एकनाथ घुले द्वीतीय तर मोहम्मद अल्तमिश या एफ वाय बी एस सी च्या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत सहभागी तसेच विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार,व उपप्राचार्य डॉ. हेमंत भंगाळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा. रत्नाकर कोळी आणि प्रा नरेंद्र पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
No comments