अधिकारी अनुपस्थितीवर कारवाईचे आदेश दीपक पाचपुते यांच्या तक्रारीची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी) : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जिल्हा परिषद ...
अधिकारी अनुपस्थितीवर कारवाईचे आदेश दीपक पाचपुते यांच्या तक्रारीची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी केलेल्या तक्रारीनंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी सर्व गटविकास अधिकारी व विभागप्रमुखांना लेखी आदेश दिले आहेत.
क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांनी दरमहा देणीनोंद व उपस्थिती अहवाल वेळेत सादर करणे बंधनकारक असून, याबाबत नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आदेशपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः देणीनोंद वेळेत न सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतन अडवण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
दीपक पाचपुते यांनी जिल्ह्यातील अनेक विस्तार अधिकारी, शाखा अभियंता व इतर क्षेत्रीय अधिकारी मासिक अहवाल वेळेवर देत नसल्याची तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने तातडीने आदेश जारी करून शिस्तपालन व पारदर्शकता यावर भर दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे अधिकारी कार्यालयात वेळेत हजेरी लावतील आणि नागरिकांच्या कामकाजात गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments