लेवा प्रतिष्ठान आयोजित नवभारत गणेश मंडळ यांची सर्वसाधारण नियोजन बैठक संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लेवा प...
लेवा प्रतिष्ठान आयोजित नवभारत गणेश मंडळ यांची सर्वसाधारण नियोजन बैठक संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लेवा प्रतिष्ठान आयोजित नवभारत गणेश मंडळ यांची सर्वसाधारण नियोजन बैठक संपन्न सभेच्या भव्यतेची परंपरा संस्कृतीची जोपासना असे ब्रीदवाक्य असलेले आपले नवभारत गणेश मंडळ अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी प्रमोद शेठ नेमाडे हे होते सभेची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आरतीने झाली त्यानंतर प्रस्तावना व त्यानंतर लोगोचे व टी-शर्टचे अनावरण करण्यात आले त्याचबरोबर गतवर्षात मृत झालेल्या समाजातील सर्व लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर मंडळाची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली तर नवभारत गणेश मंडळाच्या 2025 या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून किशोर सुधाकर महाजन उपाध्यक्ष म्हणून भोजराज शालिक ढाके सचिव म्हणून मोहन अनिल हेगडे तर खजिनदार म्हणून स्नेहल फिरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर सर्व मान्यवरांनी स्वागत केले व त्यानंतर या वर्षाची सर्व रूपरेषा निश्चित करण्यात आली

No comments