थंड वातावरणाचा सहारा घेऊन विषारी साप चोपड्यात दिसत आहेत चोपडा ( प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रावण महिन्यात कडक ऊन तापमानात व...
थंड वातावरणाचा सहारा घेऊन विषारी साप चोपड्यात दिसत आहेत
चोपडा ( प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रावण महिन्यात कडक ऊन तापमानात वाढ दिवसा उन्हाळ्यासारखे वातावरण श्रावण असूनही मुबलक पाऊस अद्याप पडलेला नाही ? अशा वातावरणात चोपडे शहरातील एस के नगर भागात आणि विशेषता कॉलनी परिसरात विषारी सर्पाचे आगमन साहजिकच आहे? चोपडे शहरातील एस के नगर भागात दिनांक ०७/०८/२०२५ रोजी महेद्र कानडे यांच्या अंगणात रात्री दीड वाजेच्या सुमाराला महावितरणचे कर्मचारी नितीन महाजन व चंद्रकांत महाजन यांनी या सर्पाला पाहिले मण्यार जातीचा हा सर्प अत्यंत विषारी असून महाजन यांनी सर्पमित्र कुशल अग्रवाल यास बोलावले रात्रीच्या सुमारास झोपलेले कुशल अग्रवाल तातडीने सर्प जिथे आहे तिथे दाखल झाले व त्यांनी सीताफिने या सापाला पकडले.तीन ते चार फुटाचा हा सर्प त्यांनी पकडून बरणी बंद केला. कॉलनीत त्यावेळी समाधानाचा सुस्कारा सुटला नागरिकांमध्ये भय व घबराट निर्माण झाली होती.कॉलनी भागात रात्री अप रात्री अशा पद्धतीचे सर्प निघत असतात नागरिकांनी न घाबरता सर्पमित्रांना पाचारण करावे असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

No comments