ताण-तणावातून मुक्त व्हा आणि आरोग्यम् धनसंपदा बना... डॉ. पाचपांडे मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रीमती जी...
ताण-तणावातून मुक्त व्हा आणि आरोग्यम् धनसंपदा बना... डॉ. पाचपांडे
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात दिनांक 23 ऑगस्ट रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने ताण - व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाचपांडे मल्टी स्पेशालिस्टचे डॉ.प्रवीण पाचपांडे उपस्थित होते. या कार्यशाळेप्रसंगी सर्वप्रथम सीपीआर Cardiopulmonary Resuscitation) चे मार्गदर्शक देवेंद्र ठोसर यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पेशंटला सीपीआर कसा आणि कोणत्या स्वरूपात द्यावयाचा हे प्रात्यक्षिकासह विवेचन केले. डॉ. सह्याद्री किनगे हिने सर्पदंशावर प्राथमिक उपचार कसे करावे याचे यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. तसेच डॉ. देवयानी पाटील हिने ( Choking Throat) घशामध्ये काही अन्नपदार्थ किंवा वस्तू अडकल्यास त्या बाहेर कशा काढावयाच्या या संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन केले. डॉ.पाचपांडे यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात ताण-व्यवस्थापन संदर्भात चर्चा करताना व्यक्तीने ताण-तणावातून मुक्त होऊन आपली प्रगती करावी आणि आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देऊन *मसल - पावर* बनून *आरोग्यम धनसंपदा व्हा..!* असा मौलिक सल्ला दिला तसेच उपस्थित प्राध्यापक बंधू-भगिनींच्या प्रश्नांना आरोग्यदायी सल्ला देत कार्यशाळेची सांगता केली. या कार्यशाळे प्रसंगी डॉ. पाचपांडे यांच्या सुविद्य पत्नी सौ पाचपांडे मॅडम उपस्थित होत्या. या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांनी केले तसेच आपले अध्यक्षीय मनोगतात 'ताण- तणावातून मुक्त होऊन...जीवनात आनंदाची उधळण करा..!' असा मार्मिक सल्ला दिला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आय क्यू ए.सी. समन्वयक प्रा. डॉ.वंदना चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

No comments