खडसे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय डास (मच्छर ) दिन साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर तालुका ए...
खडसे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय डास (मच्छर ) दिन साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगर द्वारा संचालित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाद्वारे दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी आंतरराष्ट्रीय डास दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष थोरात उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय डास दिनाच्या निमित्ताने आपल्या मार्गदर्शनपर भाषणात थोरात यांनी डासांची उत्पत्तीचे ठिकाण त्यांच्या विविध जाती व त्यापासून होणारे आजार याविषयी सखोल माहितीचे विवेचन केले. त्याचबरोबर डासांमुळे होणारे विविध आजार व ते कसे शरीरामध्ये जाऊन परिणाम करतात याविषयी सखोल माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे दिली. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांनी *स्वच्छ गाव -सुंदर गाव व डासमुक्त गाव* ही संकल्पना राबवावी अशी आशा व्यक्त केली. हा कार्यक्रम प्राचार्य हेमंत महाजन, उपप्राचार्य प्रा.डॉ. संजीव साळवे व उपप्राचार्य प्रा.डॉ. वंदना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. टी. चौधरी यांनी डासांचे विविध प्रकार कसे ओळखावे व त्यांचे जीवन चक्र कसे आहे त्याविषयी मार्गदर्शन केले. तुषार तेली या विद्यार्थ्याने कार्यक्रम साजरा करण्या मागची भूमिका व मानवी आरोग्यावर डासांमुळे होणारा परिणाम व मलेरिया संसर्गचक्र विस्तृतपणे मांडून प्रेझेंटेशन केले तसेच स्नेहा कोळी, आम्रपाली पाटील व दीक्षा दुट्टे ह्या विद्यार्थिनीनी सुद्धा डासांविषयी जागरूक राहणे व डासांचे निर्मूलन करण्यासाठी विविध उपाय योजना कशा कराव्या म्हणजे डासांची संख्या नियमित करता येईल यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी डबके हिने केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. डॉ. सुरेखा चाटे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक पाटील यांनी परिश्रम घेतले.

No comments