adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे विद्यालयात परिवहन समितीची सभा संपन्न

 स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे विद्यालयात परिवहन समितीची सभा संपन्न  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  जळगाव...

 स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे विद्यालयात परिवहन समितीची सभा संपन्न 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे आज दिनांक 11-08-2025 रोजी स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे विद्यालय व कै. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.डी.चौधरी होते. सभेस नूतन झांबरे मॅडम मोटार वाहन निरीक्षक उपप्रादेशिक कार्यालय जळगाव, कै.द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य सौ.संगीता पाटील मॅडम, श्री सोमानी सर व थेपडे माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.जी.डी.बच्छाव पर्यवेक्षक श्री.के.पी.पाटील सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.जी.डी.बच्छाव  यांनी सभेचा उद्देश उपस्थित सर्व मान्यवर व वाहनधारकांना स्पष्ट करून दिला. सभेला प्रमुख मार्गदर्शक मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील नूतन मधुकर झांबरे मॅडम  यांनी  सर्व वाहन चालक बंधूंना विद्यार्थी सुरक्षिततेचे नियम समजावून गाडीचे सर्व कागदपत्रे अद्यावत असल्याची खात्री करून घेण्याचे मार्गदर्शन करून वाहतुकीच्या नियमांविषयी सखोल माहिती दिली. त्यानंतर सभेचे अध्यक्ष श्री.पी.डी.चौधरी सर यांनी सर्व वाहनधारकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या गाडीत लाख मोलाची मुलं आहेत याची जाणीव ठेवून आपण वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून आदरणीय नूतन झांबरे मॅडम यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होईल असे आपल्या अध्यक्षीय मनोगतात ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी.पी.मगरे यांनी केले. व सभेचे आभार प्रदर्शन श्री. सोमानी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.

No comments