वारकरी साहित्य परिषदेची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगांव जामोद-- वारकरी साहित्य ...
वारकरी साहित्य परिषदेची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगांव जामोद-- वारकरी साहित्य परीषदेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प विठ्ठल पाटील काकाजी ,यांच्या प्रमुख उपस्थितीत व परम पूज्यनीय स्वामी रामभारती महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. गजानन महाराज,ह.भ.प.स्वामी वासुदेव शास्त्री महाराज, राऊत महाराज, अनंता महाराज,राहुल महाराज हभप तेजस महाराज, ह भ प शंकर महाराज यांच्या मार्गदर्शाखाली,हभप विठ्ठल महाराज,हभप विनायक महाराज,दिलीप महाराज, गोविंदा महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज, हभप , सुभद्राताई भुतेकर,मेघाताई सैतवाल,अर्चनाताई बावस्कर,यमुनाताई मारवाडीहभप युवा कीर्तनकार ह भ प भारती ताई महाराज धोटे, हभप पूजाताई बोराळे पाटील,लक्ष्मीताई ठाकरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी रामभारती महाराज मठ,चांगेफळ आश्रम येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.या आढावा बैठकीत दररोज घराघरात हरिपाठ,घर तेथे वारकरी व माळकरी झाला पाहिजे आपल्या परिषदेचा प्रत्येक घरात सदस्य कार्य केले पाहिजे विषयी चर्चा करण्यात आली,असे आवाहन करण्यात आले.यावेळी आढावा बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सर्व पुरुष व महिला तालुकाध्यक्ष,विश्वस्थ व सर्व मंडळाचे पदाधिकारी,हरीपाठ ग्रुप,सर्व महिला भजनी मंडळी व वारकरी उपस्थीत होते,कार्यक्रमांची पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


No comments