वि.का.सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात. लतेश महाजनचा सत्कार. यावल (प्रतिनिधी ) शब्बीर खान (संपादक -:- हेमकांत गायकवाड) उंटावद येथील विविध क...
वि.का.सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात. लतेश महाजनचा सत्कार.
यावल (प्रतिनिधी ) शब्बीर खान
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उंटावद येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन शशिकांत(शशी आबा ) गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली यात सन २०२४- २५ मध्ये संस्थेचे मयत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करणे मागील वर्षी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून दाखवणे सन २०२४-२५ चे वार्षिक अहवाल नफा तोटा पत्रक वाचून दाखवणे २०२६-२७ करीता बाहेरील कर्ज उभारण्याची मर्यादा ठरवणे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता बँकेच्या व इतर महत्त्वाच्या कागदपत्रावर सहयांचा अधिकाराबाबत सन २०२६-२७ करीता सभासदांची कर्जाची वैयक्तिक पत ठरविणे व क.म. पत्रक मंजुरीचे अधिकार संचालक मंडळास देणे इ.सह विविध विषयांवर चर्चा झाली तसेच महात्मा गांधी कॉलेज चोपडा येथे इलेक्ट्रिक डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षी ८९ .५०% गुण मिळून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या लतेश शशिकांत महाजन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन शशिकांत (शशी आबा ) गुलाबराव पाटील व्हा.चेअरमन अरुण दयाराम सोनवणे संचालक साहेबराव महारु पाटील,विवेक गणपत पाटील,सेवानिवृत्त प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील, दिलीप यशवंत पाटील,त्र्यंबक जयराम पाटील,विकास राजधर पाटील,जगदीश भाऊराव पाटील मुरलीधर सुधाकर पाटील,मीनाबाई शांताराम पाटील, रेशमाबाई एकनाथ पाटील,अशोक पितांबर महाजन, किशोर कडू सपकाळे,विजय मिठाराम पाटील,विकास शांताराम पाटील,मुरलीधर सुधाकर पाटील,शांताराम मार्तंड पाटील,मधुकर भास्कर पाटील,उखर्डु टीकाराम सुतार,कैलास ताराचंद पाटील,प्रमोद गणपत पाटील, भिकन बळवंत पाटील,शुक्राम गोकुळ कोळी इ.सह सभासद उपस्थित होते या सभेत प्रस्ताविक सचिव संजय दिनकर महाजन यांनी केले.

No comments