ग्रामपंचायत कार्यालय इमारत साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी घुस्सर बु ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती अधिकाऱ्यांना नि...
ग्रामपंचायत कार्यालय इमारत साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी घुस्सर बु ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती अधिकाऱ्यांना निवेदन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा:- मौजे घुस्सर बु. गावातील ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम हे सन १९६३ चे असून सध्या ही इमारत खूप जीर्ण झाली असून इमारत गळत असल्यामुळं कारभार करायला अडचण येत आहे व भिंती ,छत कधी पडेल सांगता येत नाही.कधीपण काही दुर्घटना होऊ शकते. म्हणून आमचा घुस्सर बु ग्रामपंचायत इमारत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मांगणी ग्रामपंचायत घुसर चा वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती बुलढाणा यांना निवेदना द्वारे करण्यात आली तेव्हा निवेदन देतांना सरपंच भागवत मुके , उपसरपंच उमेश वानखडे , सदस्य सुनील तायडे , तानाजी जाधव ,व गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments