adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल येथे बैलपोळा हा सण साजरा

 व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल येथे बैलपोळा हा सण साजरा  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) व्यास ...

 व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल येथे बैलपोळा हा सण साजरा 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल येथे बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला.

       बैलपोळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन यांनी स्वीकारले तसेच इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली तसेच पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम व सौ गौरी  भिरुड मॅडम यांनी देखील कार्यक्रमात उपस्थिती दिली यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ.रंजना महाजन मॅडम यांनी  मातीच्या बैलांचे व बैलजोडीचे पूजन करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला.

          शाळेच्या शिक्षिका लक्ष्मी कवडीवाले मॅडम यांनी बैलपोळा या सणाबद्दल माहिती सांगितली तसेच इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बैलावर लिहिलेली कविता गायली. प्राचार्य श्रीमती दिपाली धांडे मॅडम यांनी देखील  बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे याची माहिती  विद्यार्थ्यांना दिली.

         या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ श्रद्धा बडगुजर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन वर्षा चौधरी यांनी केले तसेच शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभून कार्यक्रम  यशस्वीरित्या  व उत्साहात शाळेत पार पडला.

No comments