यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिध...
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या फोटोला हार घालून व पूजन करून करण्यात आली . या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या सौ रंजना महाजन मॅडम व श्रीमती दिपाली धांडे मॅडम यांनी उपस्थिती दिली. शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरुड मॅडम यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका याज्ञिका जावळे मॅडम यांनी यांनी केले व व रक्षाबंधन या सणाची माहिती पूनम कोळंबे मॅडम व सिमरन तडवी मॅडम यांनी थोडक्यात माहिती सांगून मार्गदर्शन केले. यासाठी शाळेतील नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सारख्या पवित्र बहिण भावाच्या सणाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी मुलांना राख्या बांधल्या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सुजाता पाटील मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य मिळाले अशा पद्धतीने कार्यक्रम शाळेत उत्साहात साजरा झाला.

No comments