नूतन विद्या मंदिर अंजाळे येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांप्रती राखी बांधून केली कृतज्ञता व्यक्त ! भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक ...
नूतन विद्या मंदिर अंजाळे येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांप्रती राखी बांधून केली कृतज्ञता व्यक्त !
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : नूतन विद्या मंदिर अंजाळे शाळेत राष्ट्रीय हरितसेनेतर्फे पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बंधुभावाचा अनोखा संगम साधणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी शाळा परिसरातील वृक्षाना स्वतः तयार केलेल्या राख्या बांधून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. "वृक्ष आमचे खरे बंधू" हा संदेश देत विद्यार्थिनींनी निसर्गाशी भावनिक नाते दृढ करण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर रक्षाबंधनाच्या पारंपरिक उत्सवाला सामाजिक स्वरूप देत मुलींनी वर्गातील बंधूंना राख्या बांधल्या. या उपक्रमातून परस्पर स्नेह, ऐक्य आणि जपणुकीचा भाव वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी श्रीमती ज्योती परखड आणि श्री. उल्हास पाटील सर यांनी भारतीय संस्कृतीत पर्यवारणाचे स्थान याविषयीं माहिती दिली . सदर उपक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा झोपे, वरिष्ठ शिक्षक डी. व्ही. बोरोले सह सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन राष्ट्रीय हरितसेना प्रमुख श्री. लिलाधर वानखेडे सर यांनी केले. हरितसेनेचा हा अभिनव उपक्रम पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोखा या दोन्ही दृष्टींनी स्तुत्य ठरला.

No comments