फैजपूर क्रिकेटसंघाचा तालुका स्तरावर विजय जिल्हा स्पर्धेत निवड इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर मौलाना अबुल कलाम आझ...
फैजपूर क्रिकेटसंघाचा तालुका स्तरावर विजय जिल्हा स्पर्धेत निवड
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फैजपूरच्या १७ वर्षांखालील क्रिकेट संघाने तालुका स्तरावरील अंतिम फेरीत विजय मिळवून जिल्हा स्तरावर धडक दिली आहे. जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल, फैजपूर येथे झालेल्या या स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. संघ आता येत्या २९ सप्टेंबर रोजी जळगाव येथील अनुभूती इंटरनॅशनल स्कूल मैदानावर जिल्हा स्तरावर आपला पहिला सामना खेळणार आहे. संघाला क्रीडा शिक्षक कुरेशी शफीक सर व प्रशिक्षक वाहीद सर यांचे मार्गदर्शन लाभले असून मुख्याध्यापक ज़ाकिर हुसेन शेख करीम यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. सैय्यद अयान जाफर, मो. खिज़र रिजवान अहमद, शाहिद शेख सिद्दिक, सैय्यद खिज़र मो.हसन, अज़हर अज़ीम कुरेशी, मो. साद बासित अख्तर, अबू तलहा शेख मोहसिन, अली मुतक्की शेख नईम, शेख कासिम खालिक, परवेज़ शब्बीर तडवी, शेख यूसुफ महेमुद, नक़ीब जावीद अहमद, शेख हुजैफा इमरान, शेख उमर शेख रफीक, शेख अरशद रफीक. फैजपूरकरांना आता या संघाकडून जिल्हा स्तरावर उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.
No comments