क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी... प्राचार्य प्रो. डॉ.हेमंत महाजन मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्...
क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी... प्राचार्य प्रो. डॉ.हेमंत महाजन
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर :-तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी .जी .खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे आज दिनांक 29 ऑगस्ट *राष्ट्रीय क्रीडा दिन* मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी यांनी मेजर ध्यानचंद त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले .आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सक्रिय सहभाग घेऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंबन करून आपला सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन केले.
तसेच आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध मनोरंजक खेळांच्या आयोजनासोबतच बुद्धिबळ या खेळाच्या स्पर्धांचा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हर्ष जैन, सुमित तायडे, किरण पावरा, पुष्पेन्द्र धनके, रोहित लोणागरे, राहुल पावरा यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. यात सुमित तायडे प्रथम क्रमांकाने, तर रोहित लोणागरे द्वितीय क्रमांकाने यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले . बक्षीस वितरण कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य मा. डॉ.संजीव साळवे यांची उपस्थिती होती . प्राचार्य महाजन यांनी मार्गदर्शन करताना
या धकाधकीच्या जीवनात अभ्यासासोबतच ताण तणावामुक्त व निरामय आरोग्य जपण्यासोबतच, क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळावे असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभागामार्फत क्रीडा संचालक प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments